Posted on 16 Nov, 2017 07:30 pm

Likes - 0 556


झिपऱ्या’चं पोस्टर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित

केदार वैद्य दिग्दर्शित ‘झिपऱ्या’ या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘अरुण साधू’ या प्रख्यात लेखकांच्या ‘झिपऱ्या’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. आशयघन आणि वेगळ्या पठडीतला हा चित्रपट असणार आहे. झिपऱ्याने याआधीच अनेक महोत्सवात अनेक चित्रपट मिळवले आहेत. Asian Film Festival 2017 मध्ये हि ओपनिंग फिल्म ठरली आहे. मराठी चित्रपटाला इतक्या उंचीवर नेणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता आहे.

रणजित दरेकर निर्मित आणि अश्विनी रणजित दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘झिपऱ्या’ बॉक्स ऑफिसवर देखील अधिकाधिक यश मिळवो हि सदिच्छा!