Posted on 07 May, 2018 11:40 am

Likes - 0 543


त्रिकोणी प्रेमकथा घेऊन 'राजा' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला २५ मे रोजी !

‘राजा’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने आजवर समोर न आलेले प्रेमातील नवे पैलू आपल्यासमोर येणार आहेत. दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून ‘राजा’ चित्रपटाची कथा सादर केली आहे. नवोदित अभिनेता सौरदीप कुमार या चित्रपटात शीर्षक भूमिकेत असून, स्वरदा जोशी आणि निशिता पुरंदरे ‘राजा’द्वारे प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. येत्या २५ मेला ‘राजा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

निर्माते प्रवीण काकड यांनी ‘सत्यसाई मल्टिमीडिया प्रा. लि.’ या संस्थेअंतर्गत ‘राजा’ चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शनासोबतच सिनेमाच्या लेखनाची जबाबदारीही शशिकांत देशपांडे यांनी सांभाळली आहे. ‘राजा’ या सिनेमाची कथा एका पॉप सिंगरच्या जीवनावर आधारित आहे. नैसर्गिक आवाजाची सुरेल देणगी लाभलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाचा पॉप सिंगर बनण्याचा प्रवास या सिनेमात आहे. राजाच्या जीवनात येणाऱया दोन्ही नायिका त्याला त्याच्या प्रवासात यथोचित साथ देतात. यापैकी एक असते राधा, तर दुसरी मीरा. गायक बनण्यासाठी स्ट्रगल करणारा राजा नेमका कोणावर प्रेम करत असतो? ते हा चित्रपट पाहिल्यावरच समजेल.