Posted on 07 May, 2018 11:00 am

Likes - 0 485


'क्षितिज... अ होरीझाॅन'च्या शिरपेचात राज्य पुरस्काराचा मानाचा तुरा

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर यशस्वी कामगिरी करणाऱ्या 'क्षितिज... अ होरीझाॅन' या सिनेमाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा पुरस्कार रोवला गेला आहे.  मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस) आणि नवरोज प्रसला प्राॅडक्शनचे नवरोज प्रसला निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर सहनिर्मित या सिनेमाने नुकत्याच पार पडलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या अंतिम यादीत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच या सिनेमाच्या सर्वोक्तृष्ट ध्वनीमुद्रणासाठी ऑस्करविजेते रसूल पुकुट्टी यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

तसेच याआधी झालेल्या विविध अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्येदेखील या सिनेमाला नावाजण्यात आले असल्यामुळे, दिग्दर्शक मनोज कदम यांच्या 'क्षितिज... अ होरीझाॅन' चे महत्व आणखीनच वाढले आहे.  शिक्षणाचे महत्व सांगणाऱ्या या सिनेमाचे प्रोफेसर रेबन देवांगे यांनी लिखाण केले आहे. तसेच नीरज वोरलीया यांनी संकलित या सिनेमाचे  योगेश राजगुरू यांनी छायाचित्रण केले आहे.