Posted on 01 Feb, 2019 05:20 pm

Likes - 0 492


‘पाँडीचेरी’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

अभिनेत्री सई ताम्हणकर ‘पाँडीचेरी’ या चित्रपटात झळकणार आहे. पाँडीचेरीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. या चित्रपटातील सईचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

दिग्दर्शक सचिन कुंडलकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. ‘दुरवर राहणाऱ्या कुटूंबाची गोष्ट’, असे कॅप्शन या पोस्टरवर दिले आहे.

हा पोस्टर ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ स्वरुपात आहे. या पोस्टरमध्ये सईसोबत अभिनेता वैभव तत्ववादी देखील दिसत आहे. ‘हा पहिला असा चित्रपट आहे जो आयफोनवर चित्रीत करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये माझा लूक हा नॅचरल असून नो मेकअप, नो हेअरस्टाईल असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पाँडीचेरीत चित्रीत होणार आहे’, असे सई ताम्हणकर हीने सांगितले.