Posted on 01 Feb, 2019 08:50 pm

Likes - 0 530


रोमॅन्टिक कॉम्बिनेशन असलेलं 'रेडीमिक्स'चं गाणं प्रदर्शित

प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच फेब्रुवारी महिन्याचे विशेष आकर्षण असते. याच प्रेमाच्या महिन्यात प्रेक्षकांवर पुन्हा एकदा प्रेमाची भुरळ लण्यासाठी लोकप्रिय जोडी वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे परतले आहेत. येत्या ८ फेब्रुवारीला त्यांचा एक नवीन रोमँटिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रेडीमिक्स' असे या चित्रपटाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांची रोमॅन्टिक केमेस्ट्री असलेल 'का मन हे गाणं' अलिकडेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणं आर्या आंबेकर आणि फर्हाद भिवंडीवाला यांनी गायले आहे. अविनाश आणि विश्वनाथ यांच्या जोडीने या गाण्याला संगित दिले आहे.

'रेडीमिक्स' पूर्वी वैभव आणि प्रार्थना यांच्या जोडीने अनेक रोमॅन्टिक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अॅन्ड मिसेस सदाचारी', 'व्हाट्स अप लग्न', या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. आता 'रेडीमिक्स' चित्रपटातही त्यांची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री नेहा जोशी देखील झळकणार आहे. त्यामुळे हा चित्रपट एक लव्ह ट्रॅंगल असणार आहे.