Posted on 21 May, 2018 04:50 am

Likes - 0 499


मिलिंद सोमणने शेयर केलाय हनीमुनचा फोटो

अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिता कोवर गेल्या महिन्यात विवाह बंधनात अडकले. अंकिता मिलिंदपेक्षा अनेक वर्षांनी लहान असल्याने त्यांची जोडी सोशल मिडीयावर चांगलीच ट्रोल झाली. त्यांंच्यामध्ये असणाऱ्या वयाच्या अंतरामुळे लोक त्यांची खिल्ली उडवतात परंतु मिलिंद आपलं नातं जगातील सर्वात सुंदर नातं मानतो आणि ते आणखी सुंदर बनविण्यासाठी कायम प्रयत्नात असतो. लग्नानंतर  मिलिंद आणि अंकिता यांनी लगेच हनिमूनला न जाता एक अनोखा उपक्रम राबवला होता. या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत होते.

सध्या मिलिंद आणि अंकिता हवाई येथे हनिमूनला गेले आहेत. तिथे एकमेकांच्या प्रेमात नितांत बुडालेले असतानाही मिलिंद आपल्या फिटनेसची काळजी घेतो. तो आपले डाएट फॉलो करण्याबाबत अजिबात हलगर्जीपणा करत नाही. मिलिंदने सोशल मिडीयावर आपले आणि अंकिताचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. त्यापैकी काही फोटो खाजगी स्वरूपाचे आहेत त्यामुळे सध्या तो चाहत्यांकडून चांगलाच ट्रोल होत आहे.