Posted on 22 May, 2018 05:30 am

Likes - 0 494


‘मुंबई पुणे मुंबई- ३’ चित्रपट २८ सप्टेंबर २०१८ रोजी होणार प्रदर्शित

मराठीतील लोकप्रिय सिक्वल म्हणून मुंबई पुणे मुंबई या सिनेमाकडे पाहिलं जातं. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी या दोघांना घेऊन दिग्दर्शक सतीश राजवाडे याने मुंबई पुणे मुंबई आणि मुंबई पुणे मुंबई 2 हे सिनेमे प्रेक्षकांसाठी आणले. 

गौरी आणि गौतमची प्रेमकथा यशस्वी ठरल्यावर आता याचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 27 एप्रिल रोजी याचा पोस्टर शेअर केला होता. आता हा सिनेमा 28 सप्टेंबर 2018 रोजी प्रेक्षकांसाठी सिनेमागृहात भेटायला येणार आहे. आज सकाळपासूनच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे. मुक्ता बर्वेने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या चाहत्यांना आवडत आहे. 

आतापर्यंत मराठी सिनेमांमध्ये कोणत्याही सिनेमाचे तीन भाग आले नव्हते. त्यामुळे सतीश राजवाडेचा हा प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगा आहे असे म्हणावे लागेल. या सिनेमात दुसऱ्या भागात दिसलेली कलाकार मंडळी तिसऱ्या भागातही दिसणार आहेत. पण या सिनेमातील मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे.