Posted on 21 May, 2018 05:10 am

Likes - 0 524


प्रिया वारियरचा हा नवा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का ?

पुन्हा मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून प्रियाच्या ‘उरू अदार लव्ह’ या गाण्याचा आणखी एक टीजर प्रदर्शित करण्यात आला असून, सध्या तो सर्वत्र व्हायरल होत आहे. प्रिया यात शाळेत नाहीतर एका प्रयोगशाळेत आपल्याला दिसत आहे.

यू-ट्यूबवर सध्या प्रियाचा हा व्हिडीओ ट्रेंड करीत आहे आणि तो मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे. यात प्रियासोबत तिचा को-स्टार रोशन अब्दुलही खूपच छान दिसत आहे. या गाण्याला तिचा सुंदर आणि प्रेमळ चेहरा आणखी खास बनवितो. ऐवढेच नाहीतर या गाण्यात ते शाळादेखील बघायला मिळत आहे. उमर लुलू यांनी ‘उरू अदार लव्ह’ला दिग्दर्शित केले आहे. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.