Posted on 16 May, 2018 02:20 pm

Likes - 0 467


मिथुन चक्रवर्ती उपचारासाठी दिल्लीत दाखल

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून पाठीच्या आजाराने त्रस्त आहेत. पाठीच्या आजारावर इलाज करण्यासाठी मिथुन चक्रवर्ती दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.

२००९ मध्ये ‘लक’ सिनेमाच्या शूटींगदरम्यान त्यांच्या पाठीला दुखापत झाली होती. अनेक दिवसांपासून या दुखापतीवर उपचावर सुरू होते. पाठीच्या दुखापतीवर त्यांनी लॉस एंजेलिसमध्येही उपचार घेतले होते. उपचारानंतर त्यांनी कामास सुरूवात केली होती, मात्र पुन्हा सुरू झालेल्या दुखापतीमुळे त्यांनी कामातून ब्रेक घेतला आहे.

तब्येत बरी नसल्याने त्यांनी राज्यसभेचाही राजीनामाही दिला आहे. यावर्षी मिथुन चक्रवर्ती यांचे हिंदी, तमिळ, बंगाली मिळून ६ सिनेमे रिलीज होणार आहेत. मात्र त्यांच्या जुनाट दुखण्यामुळे त्यांच्या सर्व प्रोजेक्टची कामे रखडली आहेत.