Posted on 14 May, 2018 11:10 pm

Likes - 0 488


बिग बॉस मराठी : ‘या’ स्पर्धकाची होणार पुन्हा एन्ट्री

बिग बॉसच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जणघराबाहेर जाते. रेशम किंवा राजेश यांमधून कोणा एकाचे एलिमनेशन होणार होते. परंतु, राजेश शृंगारपुरेला बिग बॉसने सिक्रेट रूम मध्ये ठेवले आहे. जिथून तो स्पर्धकांचे संभाषण ऐकू शकतो. घरातील सदस्यांना राजेश खोलीत बंद असल्याची कल्पना नसल्याने ते राजेश स्पर्धेतून बाहेर गेल्याचे समजत आहेत. परंतु राजेश मात्र घरातील सदस्य काय करतात यावर लक्ष ठेऊन आहे.

घरात एकटं राहण्याचा कंटाळा आला आहे, मुलीची, पत्नीची आठवण येते, मला बाहेर जाऊ देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती राजेशने बिग बॉसला केलीय. यावेळी राजेश अनेकदा भावूकही झालेला दिसला. काल अनिल थत्ते यांना नॉमिनेशन प्रक्रियेत सर्वांत कमी मतं मिळाली आणि त्यांना आपला गाशा गुंडाळून ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडावं लागले आहे. त्यानंतर रविवारी राजेश शृंगारपुरेची घरवापसी होईल असे सगळ्यांना वाटले होते. मात्र तसे झाले नाही. आज राजेश बिग बॉस मराठीच्या घरामध्ये परतणार असून, रेशम, आस्ताद, सुशांत, जुई सगळ्यांच खूप आनंद झाल्याचे दिसून येणार आहे.

रेशम आणि राजेश हे दोघीही मागील आठवड्यामध्ये डेंजर झोनमध्ये होते. रेशम टिपणीस घरामध्ये परतली पण, राजेश याला अनिश्चित काळासाठी  अज्ञात वासामध्ये ठेवण्यात आले होते. परंतु घरच्यांसाठी मात्र तो एलिमनेट झालेला होता. आज राजेश याला बिग बॉस त्याचा अज्ञात वासाचा कालावधी संपला असे घोषित करून परत बिग बॉसच्या घरामध्ये पाठवणार आहेत. राजेशच्या येण्याने आता घरामध्ये तसेच सदस्यांमध्ये काय बदल बघायला मिळतील हे बघण्यासारखे असणार आहे. राजेश घरी परतल्यावर, “मी फक्त तुझ्यासाठी या घरामध्ये आला” असे राजेशने रेशमला बोलून दाखवले आहे.