Posted on 21 May, 2018 05:00 am

Likes - 0 463


‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर माधुरी अन् करण जोहर

आजपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी ‘चला हवा येऊ द्या’च्या इतिहासात उपस्थिती लावली. आमिर, शाहरुख, सलमान नंतर प्रतीक्षा होती ती बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी मराठमोळी धकधक गर्ल ‘माधुरी दीक्षित’ यांची. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर माधुरी आपला पहिला वाहिला मराठी चित्रपट घेऊन ‘बकेट लिस्ट’आली.

चला हवा येऊ द्या टीम ने यावेळी ‘हम आपके है कौन’वर स्किट करून धमाल उडवून दिली. करण जोहर हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या प्रमोशनमध्ये याशिवाय सुमीत राघवन, रेणुका शहाणे यांनीही आपला सहभाग नोंदवला. ‘बकेट लिस्ट’ टीमसोबत माधुरीने आपला वाढदिवस साजरा केला.

‘हवा येऊ द्या’च्या सेटवरचा करण जोहर यांना आपला अनुभव विचारला असता ते म्हणाले. मी या मंचावर माझ्या आगामी ‘धडक’ या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी परत येईन. या निमित्ताने गेली ४ वर्ष अविरत प्रेक्षकांना हसवणाऱ्या या टीम मध्ये अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. येत्या २१ आणि २२ मे रोजी रात्री ९.३० वा. ‘चला हवा येऊ द्या’ चा हा शो झी मराठीवर प्रसारित होणार आहे.