Posted on 25 Jan, 2019 03:10 pm

Likes - 0 585


‘ही’ मराठमोळी अभिनेत्री बनणार आई

मराठी सिनेसृष्टीत एक गोड बातमी मिळणार आहे. एका अभिनेत्रीच्या घरी एक लहान पाहुणा येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या मराठमोळी अभिनेत्रीचे नाव आहे नम्रता आवटे संभेराव.

अभिनेत्री नम्रता आवटे संभेराव हीचे फोटो सोशल सध्या मीडियावर व्हायरल झाले आहेत.तिला मराठी चित्रपटसृष्टीतल्या मित्रमैत्रिणींनी सरप्राईज देत डोहाळे जेवण म्हणजेच बेबी शॉवर सेलिब्रेट केला.हे डोहाळे जेवण जरा हटके स्टाईलने करण्यात आले. वेस्टर्न स्टाईलने हा डोहाळे साजरा करण्यात आले. नम्रता म्हणाली की, मला आणि माझा नवरा योगेश संभेराव यांना हे डोहाळे सरप्राईज होते.

यावेळी श्रेया बुगडे, हर्षदा खानविलकर, तेजस्विनी पंडित. सुयश टिळक, सुप्रिया पाठारे, आनंद प्रभू, धैर्यशील घोलप, ज्योती चांदेकर, पूजा पवार, ज्योती पाटील, प्रसाद जावडे, खुशबू तावडे व मृणाल देशपांडे यांनी नम्रताला सरप्राईज देत तिचे डोहाळे जेवण मोठ्या उत्साहात साजरे केले. नम्रताने रिएलिटी शोमध्ये आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे.