Posted on 01 Jan, 1970 05:30 am

Likes - 0 583


‘4GB’ : नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला…

किशोरवयीन मुलांच्या आयुष्यावर, त्यांच्या मजा मस्तीवर आता चित्रपट येऊ लागले आहेत. एफ यु आणि बॉईजच्या अफाट यशानंतर असाच किशोरवयीन मुलांच्या जीवनावर आधारित नवा चित्रपट येत आहे. सचिन आंबट दिग्दर्शित या चित्रपटाचे शीर्षक आहे ‘4GB’. संगीतकार प्रितीश कामत आणि मितीश चिंदरकर हे या चित्रपटाचे निर्माते असून त्यांनीच या चित्रपटाला संगीतही दिलं आहे. शंकर महादेवन आणि जावेद अली यांसारख्या दिग्गज गायकांनी ‘4GB’ मधील गाणी गेली आहेत. त्यामुळे चित्रपटात वेगळ्या आणि धमाल कथेसोबतच संगीताचीही ट्रीट असेल यात शंका नाही. त्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.
 
या सिनेमाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर पाहायला मिळालं. यावरून चित्रपट नक्कीच इंटरेस्टिंग वाटतो आहे.या सिनेमाची स्टारकास्ट पूर्णपणे नवीन असून शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर विशेषतः त्यांच्या इंटरनेटविश्वावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. जीवा राऊळ आणि ऍडलॅब्स प्रोडक्शन प्रस्तुत ‘4GB’ हा चित्रपट येत्या १७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.