Posted on 01 Jan, 1970 05:30 am

Likes - 0 552


बिस्किटचं मोशन पोस्टरही गोड गोड…

एक्सपांशन फिल्म्स प्रा. लि. निर्मित ‘बिस्किट‘ या सिनेमाचं मजेशीर मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. नाद लावणाऱ्या संगीतावर वाऱ्याने विरून जाणारे फुगे उडवणारा खेळकर मुलगा… या सुंदर दृश्याचे वर्णन म्हणजे बिस्कीट आहे का, असा प्रश्न पडतो, आणि त्याबद्दल उत्सुकताही निर्माण होते. बिस्किटची हि झलक प्रचंड सुखावणारी आहे, कारण लहानपण असतंच सुखावणारं. त्याला अशा संगीताची आणि नयनसुख देणाऱ्या दृश्यांची जोड लाभली आहे.
 
‘रवींद्र शेवाळे‘ दिग्दर्शित ‘बिस्किट’ हा लहान मुलांच्या गोड कल्पनांच्या विश्वात नेणारा सिनेमा आहे असे एकंदरीत मोशन पोस्टरवरून आत्मसात होते. ‘पद्मश्री शेवाळे‘ यांची निर्मिती असलेला हा कुरकुरीत ‘बिस्कीट’ रसिक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि मराठी सिनेमांत चालू झालेल्या चुरशीमध्ये सरस ठरेल या सदिच्छा! रक्षा एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि एक्सपांशन फिल्म्स निर्मित बिस्कीट हा चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.