Posted on 01 Jan, 1970 05:30 am

Likes - 0 555


या विनोदवीरांची घरातील अवस्था पहा…

आपल्या विनोदाने पोट धरून हसवणारे ‘चला हवा येऊ द्या’मधील आपले लाडके कलाकार रसिकांना हसवण्यासाठी काय करतील याचा अंदाज या भूतलावर कोणीच लावू शकत नाही. कधी ते मोठमोठ्या कलाकारांची ठसठशीत नक्कल करतात, तर कधी दिग्गज कलाकारांचीही आदराने, पण भीतीने मस्करीही करतात. भाऊ कदम कधी शांत बाई बनतो, तर कधी कुशल बद्रिके निरागस पण धीट बाई साकारतो. सागर कारंडेची स्वारगेट बाई तर सग्यांनाच आवडते, पण हल्लीच मिशी काढलेल्या भारत गणेशपुरेंनी साकारलेली सुंदर वऱ्हाडी बाईही सगळ्यांनाच भावते.

अशा या आपल्या लाडक्या विनोदवीरांना घरात किती कष्ट घ्यावे लागतात, बायकोच्या त्रासाला कसं सहन करावं लागतं अशा आशयाचे खोचक प्रश्न केले जातात. कदाचित प्रेक्षकांच्या याच प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कुशल बद्रिके याने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो पोस्ट केले. यात भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि स्वतः कुशल घरात कसे असतात, कसे वागतात, अर्थात घरात त्यांची काय अवस्था असते ते त्यांच्या विनोदी ढंगात दाखवले आहे. कुशल भांडी घासत आहे, सागर केर काढत आहे, तर भारत लादी पुसत आहे. पण या सगळ्यातही श्रेया बुगडे आरामात बसून चहा पित आहे.

यावर कुशल लिहतो,
“अरे संसार संसार
झाडू, लादी, भांडी कर,
तुला दिली रे देवाने
एक बायको डोक्यावर..!”