Posted on 13 Feb, 2018 02:30 pm

Likes - 0 518


सुमेध – स्वानंदीची जमली जोडी

ज्यांनी साऱ्या सृष्टीला हसवलं, असे लक्ष्मीकांत बेर्डे. या दिवंगत अभिनेत्याचा मुलगा अभिनय बेर्डे याने “ती सध्या काय करते” या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. अभिनयच्या पाऊलावर पाऊल ठेवत स्वानंदीसुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. “रिस्पेकट” हा तिचा पहिला सिनेमा असलं तरी योगेश जाधव दिग्दर्शित “मन येड्यागत झालं” या सिनेमात आधी पाहायला मिळणार आहे. स्वानंदी या सिनेमात सुमेध मुद्गलकरबरोबर झळकणार आहे.

या सिनेमाचे लेखन सुदर्शन पांचाळ आणि विकास जोशी यांनी केले आहे. कुणाल कंदकुर्ते आणि संदीप जोशी हे दोघे या सिनेमाचे दिग्दर्शक असणार आहेत. निलेश पतंगे हे या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या सिनेसृष्टीला आणखी एक हटके जोडी मिळणार आहे. येणाऱ्या काळात स्वानंदीच्या रूपाने गुणी अभिनेत्री आपल्याला मिळणार आहे.