Posted on 13 Feb, 2018 02:30 pm

Likes - 0 523


महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे प्रथमच दिग्दर्शकाच्या भूमिकेत…

आपल्या  आवाजाची जादू संपूर्ण महाराष्ट्रात गाजवणारे आनंद शिंदे आपल्या प्रत्येकाला माहिती आहेत. त्यांच्या आवाजातील अनेक गाणी आपण ऐकत आलो आहोत. मराठी सिनेसृष्टीला अनेक हिट गाणी देणारे आनंद शिंदे दिग्दर्शकीय पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. “जेव्हा नवीन पोपट हा” आणि “गणपती आला आणि नाचत गेला” या गाण्यातून तमाम प्रेक्षकवर्गाला थिरकवणारे आनंद शिंदे “नंदू नटवरे” या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. धम्माल विनोदी चित्रपट असलेल्या या सिनेमात आनंद शिंदे यांचे सुपूत्र डॉ उत्कर्ष शिंदे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. जुहू येथील आजीवसन स्टुडिओमध्ये सिनेमातील लोकगीताचे रेकॉर्डिंग करून सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. साई इंटरनॅशल फिल्म्स आणि शिंदेशाही प्रस्तुत असलेल्या या सिनेमाची निर्मिती साई अग्रो टेक या संस्थेअतंर्गत उमेश जाधव, शंभू ओहोळ, विजय जगताप आणि अरविंद अडसूळ हे निर्माते आहेत.

या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमातील गाण्यांना आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांचे संगीत लाभणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमातून शिंदेशाही घराण्यातील संगीतसमृद्धीचा आस्वाद घेता येणार आहे. या सिनेमातील इतर कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. या सिनेमाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून सोलापूर, भोर, मुंबई याठिकाणी या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. महागायक आनंद शिंदे यांच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा एक पर्वणीच ठरणार आहे.