Posted on 03 Nov, 2017 12:40 pm

Likes - 0 696


सा रे ग म प लिटील चॅम्प्स २०१७’ ची विजेती अंजली गायकवाड..

छोट्या पडद्यावरील पॉप्युलर सिंगिंग 'शो सारेगमप लिटील चॅम्प्स २०१७'च्या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून होते. साधारणपणे कोणत्याही रिअॅलिटी शोचा एकच विजेता असतो. पण यावेळी महाअंतिम सोहळ्यात महाराष्ट्राची अंजली गायकवाड आणि पश्चिम बंगालचा श्रेयन भट्टाचार्य यांना विजेतेपद मिळाले.

अहमदनगरच्या ११ वर्षीय अंजलीने अंतिम सामन्यात ‘दीवानी मस्तानी…’, ‘झल्ला वल्ला…’ आणि ‘मैं कोल्हापूर से आई हॅू…’ ही गाणी गायली. तर १२ वर्षांच्या श्रेयनने अंतिम सोहळ्यात ‘सूरज डूबा…’, ‘हवाएं…’ आणि ‘जालिमा…’ ही गाणी गायली. 

जयपूर येथे झालेल्या ‘सा रे ग म प लिटील चॅम्प्स’चे महापरीक्षक नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि जावेद अली होते. या तिघांसोबत अन्य ३० जण देखील ‘ज्युरी’ म्हणून होते. तर आदित्य नारायण याने या शोचे सूत्रसंचालन केले होते. अंतिम सामन्याला कपिल शर्मा, भारती सिंग, रवी दुबे आणि पराग त्यागी यांनीही उपस्थिती लावली होती.

अंजलीला ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ जिंकल्याबद्दल 5 लाखांचं पारितोषिक मिळालं. अंजली गायकवाडने या आधी झी युवा वरील संगीत सम्राट रिएलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यावेळेस तिची बहिण नंदिनी गायकवाड हिने हि भाग घेतला होता आणि ह्या शोच्या विनर सुद्धा झाल्या होत्या. नंदिनीनेपण ‘सारेगमप लिटील चॅम्प्स २०१७’ मध्ये भाग घेतला होता पण ती लवकर आऊट झाली.