Posted on 16 May, 2018 02:30 pm

Likes - 0 495


न्युयॉर्क फिल्म फेस्टीवलमध्ये न्यूड ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील विलेज ईस्ट सिनेमा येथे १८वा न्यूयॉर्क चित्रपट महोत्सव ७ मे ते १२ दरम्यान पार पडला. न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात रवी जाधव दिग्दर्शित न्यूड या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा मान मिळाला असून चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री कल्याणी मुळे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

न्यूड चित्रत्रपटाने न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले तर राजकुमार रावलच्या ओमेर्ताने या महोत्सवाचा शेवट करण्यात आला. अनेक चित्रपटांना मागे टाकत न्यूडने हा किताब पटकावला आहे.