Posted on 28 Dec, 2017 02:30 pm

Likes - 0 539


माझ्यासाठी हे वर्ष ठरलं इच्छापूर्ती करणारं वर्ष

2०१७ साल हे माझ्यासाठी खूपच महत्वपूर्ण ठरलं. या वर्षाच्या खूप आठवणी आहेत, खूप महत्वाच्या घटना आहेत ज्या या वर्षी घडल्या. मी असं म्हणेन २०१७ सालच्या माझ्या या वारीमध्ये माझ्या तीन महत्वाच्या इच्छापूर्ण झाल्या. माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी कधीच कुठल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले नव्हते. पण माझी ही इच्छा कलर्स मराठी या वाहिनीने पूर्ण केली.

या वर्षी मी कॉमेडीची GST एकस्प्रेस आणि सध्या सुरु असलेला आणि प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असलेला तुमच्यासाठी काय पन या दोन कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी मला मिळाली आणि माझी बऱ्याच वर्षांपासूनची अपुरी इच्छा पूर्ण झाली.

तसेच प्रत्येक मराठी माणसाचं वा महाराष्ट्रात रहाणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं कि, आयुष्यात एकदातरी पंढरपूरच्या “वारीला” जाण्याची संधी मिळावी आणि माझी ही इच्छा २०१७ साली पूर्ण झाली. ही वारी म्हणजे “आठवणीतला ठेवा” आहे असे मी म्हणेन. म्हणून मी म्हणेन कि, २०१७ हे वर्ष माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अस ठरलं ज्यामध्ये माझी इच्छापूर्ती झाली.

तसेच “व-हाड निघालंय लंडनला” हे जे आमचं नाटक आहे ते महाराष्ट्रात तर प्रसिध्द आहेच पण माझी इच्छा होती कि मुंबईकरांना देखील या नाटकाचा आस्वाद घेता यावा. माझी ही इच्छा प्रशांत दामले यांच्या पाठिंब्यामुळे पूर्ण होऊ शकली.

येत्या वर्षी अजून एक चांगल नाटक करण्याची इच्छा आहे तसेच कामाबरोबर तब्बेतीकडे देखील लक्ष देणार आहे