Posted on 28 Dec, 2017 02:30 pm

Likes - 0 550


बारायण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

नुकताच बहुचर्चित आणि आगामी ‘बारायण’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून या चित्रपटात बारावीच्या मुलांची पालकांच्या अपेक्षांमुळे काय काय तारांबळ उडते ते मजेशीर मांडण्यात आले आहे. घरातील सर्वांसाठी तसेच मित्र आणि परिचितांसाठी बारावीचे वर्ष हे कसा चर्चेचा विषय असतो. हे बारायणच्या ट्रेलरवरून दिसून येत आहे.

एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तर चित्रपटातील संवाद अधिक स्पष्ट आणि साधे सोपे असल्यामुळे कोण काय म्हणत आहे असे विचारण्याचा प्रश्न येत नाही.