Posted on 01 Jan, 1970 05:30 am

Likes - 0 523


अजय देवगणच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

अजय देवगण 'आपलं माणूस' या मराठी चित्रपटाची निर्मिती करतोय हे यापूर्वीच आपल्याला कळलय. त्याची ही मराठीतील दुसरी निर्मिती आहे. नाना पाटेकरची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

शेतान बाटलीत मावणार नाय !  अशी टॅगलाईन या चित्रपटाचा पहिल्या पोस्टवर झळकली आहे. त्यामुळे नाना पाटेकर एका अवलियाच्या भूमिकेत या चित्रपटात दिसेल हे निश्चित.

या चित्रपटात अजयचा जिगरी दोस्त नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत असून चित्रपटाची कथा त्यांच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते. सुमित राघवन आणि इरावती हर्षे हेदेखील महत्वपूर्ण भूमिकांत दिसतील. मे मध्ये झालेल्या मुहूर्ताचा क्लॅप काजोलने दिला होता.

अजय देवगण निर्मित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित 'आपलं माणूस' ९ फेब्रुवारी २०१८ ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.