Posted on 29 Nov, 2017 10:30 am

Likes - 0 584


‘माया’ रंगली देवाच्या रंगात! ‘देवा’साठी तेजस्विनीचा हटके लूक…

‘रोज रोज नव्याने’ हे ‘देवा – एक अतरंगी’ या चित्रपटाचं गाणं आपण पाहिलंच आहे. यात अंकुश चौधरी हा रंगबिरंगी, बेधुंद असा तरुण दिसत आहे, तर त्याला शोधणारी ‘माया’ देखील वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. तेजस्विनी पंडित या ‘माया’ची भूमिका साकारत असून तिची व्यक्तिरेखा एका वेगळ्याच वळणार आपल्याला आढळून येते, आणि हि मायाही देवासारखीच बेधुंद वाटते.

आपल्या प्रेमाचा रंग आसपास सर्वत्र फिरवणारा देवा ‘माया’च्या आयुष्यात अनोखे रंग भरतो आणि माया सुद्धा रंगीत होते. या मायाचा लूक म्हणजे बेधुंद भटकत राहणारे ट्रॅव्हलर्स! मोठी ट्रॅव्हलर बॅग खांद्यावर घेऊन, त्यावर अँग्री बर्ड्सचे किचेन, गळ्याभोवती आणखी एक खादीची बॅग घेऊन फिरणारी भटकी. डोळ्यांवर मोठ्या फ्रेम्सचा चष्मा, गळ्यात हेडफोन्स, फन्की नेकलेस आणि हातात खूप सारे फन्की बँड! या साऱ्यातही माया देवाची वाटते ते तिच्या डोक्यावर असलेल्या खास देवा स्टाईल कपड्याने… ती लहानशी पगडीही मायाच्या लूकमध्ये विशेष भर घालते आणि तेजस्विनीला पूर्णपणे ‘माया’ बनवते.

मुरली नलाप्पा दिग्दर्शित ‘देवा’ १ डिसेंबर  रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.