Posted on 13 Nov, 2017 09:20 pm

Likes - 0 623


मराठी मुली पल्लवी पाटील जातेय थेट हॉलिवूडला!

‘पार्टनर’ या एकांकिकेतून पल्लवी पाटील हे नाव मराठी अभिनय क्षेत्रात आले, आणि त्यानंतर अनेक टप्पे या नावाने गाठले. रुंजी हि मालिका टेलिव्हिजनवर आली, आणि पल्लवी पाटील हि अभिनेत्री रुंजी या मालिकेतून घराघरात पोहोचली. तिने ‘रुंजी’मध्ये मुख्य भूमिका बजावली. त्यात तिचे प्रचंड कौतुकही करण्यात आले. पण आता पल्लवी आपल्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे. पल्लवी आता हॉलिवूडपटात काम करणार आहे. पल्लवीने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली असल्याचं वृत्त आहे. ‘स्वोर्ड्स अँड स्केपट्रेस‘ या चित्रपटात ती काम करत असल्याचे कळत आहे. स्वोर्ड्स अँड स्केपट्रेस हा झाशीच्या राणीच्या आयुष्यावर आधारित असलेला युद्धपट आहे. त्यामुळे त्यात अर्थात भारतीय रक्त हे हवेच. त्यातील पल्लवीची भूमिका कोणती असेल हे कळले नसले तरी पल्लवी नक्कीच योग्य भूमिका बजावेल हे नक्की.