Posted on 08 Jan, 2018 01:46 pm

Likes - 0 519


कल्याणचा नचिकेत लेले ठरला ‘सारेगमप’चा महाविजेता

सारेगमप या सप्तसुरांची बरसात करणा-या मैफिलीचा शानदार महाअंतिम सोहळा मुंबईत संपन्न झाला. सारेगमपच्या तेराव्या पर्वाचा महाविजेता कल्याणचा नचिकेत लेले ठरला.

तर यवतमाळचा उज्ज्वल गजभार द्वितीय आणि पुण्याचा अक्षय घाणेकर तृतीय स्थानी आला. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दहा तास अशा प्रकारचा हा संगीतमय सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्याचं खास आकर्षण ठरला, तो म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार! अक्षय आणि सोनम कपूर त्यांच्या आगामी ‘पॅडमॅन’या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सारेगमपच्या मंचावर आले होते. अक्षयने आपल्या खास शैलीत ‘ढगाला लागली कळ’ हे गाणं गाऊन प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले