Posted on 01 Jan, 1970 05:30 am

Likes - 0 359


'झी मराठी अॅवॉर्ड्स २०१७' चे नामांकने जाहिर

झी मराठीच्या मालिका प्रेक्षकांमध्ये कमालीच्या लोकप्रिय आहेत. सायंकाळची साडेसहाची वेळ झाली की घराघरांत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमापासून झी मराठी सुरु होतो आणि ‘रात्री जागो मोहन प्यारे’ मालिकेपर्यंत प्रेक्षक मनोभावे हे कार्यक्रम बघतात. ‘लागिरं झालं जी’ असो की ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. ‘माझ्या नव-याची बायको’ मधील राधिकाच्या समस्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. ‘चला हवा येऊ द्या’ ची मंडळी प्रेक्षकांना खळखळून हसवतात तर ‘गाव गाता गजालीची’ मालवणी मंडळी प्रेक्षकांना रोज नव्या नव्या गजाल सांगून त्यांचं मनोरंजन करतात.

यासोबतच नव्याने दाखल झालेल्या ‘जाडूबाई जोरात’, ‘तुझं माझं ब्रेक अप’मधील व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांनी आपल्या घरांत आणि मनात स्थान दिलं आहे. तर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या भव्यतेने प्रेक्षकांचे डोळे दिपून गेले आहेत. एकंदरीत प्रत्येक वयोगटातील आणि प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम झी मराठी अविरतपणे करीत आहे. याच मालिकांचा आणि त्यातील व्यक्तिरेखांचा गौरव झी मराठी अॅवॉर्ड्सच्या माध्यमातून करण्यात येतो. यासाठी प्रेक्षकांकडून कौल मागविण्यात येतो. यंदाही ही प्रक्रिया सुरु झाली असून प्रेक्षक मिस्ड् कॉलद्वारे, झी मराठीच्या अधिकृत फेसबुक पेज आणि झी मराठीच्या वेबसाईटद्वारे www.zeemarathi.com हे मतदान करु शकतात.

महत्त्वाच्या पाच विभागांसाठी पुढील क्रमांकावर मिस्ड् कॉल देऊन मतदान करता येऊ शकणार आहे. मतदानाची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१७ ही आहे.

1800 120 1901- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री,

1800 120 1902 - सर्वोत्कृष्ट अभिनेता,

1800 120 1903 - सर्वोत्कृष्ट जोडी       

1800 120 1904 - सर्वोत्कृष्ट मालिका   

1800 120 1905 - सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम  

 

झी मराठी अॅवॉर्ड्स २०१७ नामांकने

सर्वोत्कृष्ट मालिका

 • गाव गाता गजाली
 • लागिरं झालं जी
 • जाडूबाई जोरात
 • तुझ्यात जीव रंगला
 • नकटीच्या लग्नाला यायचं हं
 • माझ्या नवऱ्याची बायको
 • जागो मोहन प्यारे

सर्वोत्कृष्ट कथा बाह्य कार्यक्रम

 • चला हवा येऊ द्या
 • आम्ही सारे खवय्ये
 • होम मिनिस्टर
 • रामराम महाराष्ट्र
 • वेध भविष्याचा

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री

 • गोदाक्का - तुझ्यात जीव रंगला
 • मोहिनी - जागो मोहन प्यारे
 • जुई - जाडूबाई जोरात
 • शोभा - जागो मोहन प्यारे
 • शनाया - माझ्या नवऱ्याची बायको
 • मल्लिका - जाडूबाई जोरात
 • राधिका - माझ्या नवऱ्याची बायको

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष

 • मोहन - जागो मोहन प्यारे
 • सुहास - गाव गाता गजाली
 • नाना - माझ्या नवऱ्याची बायको
 • प्रतापराव - तुझ्यात जीव रंगला
 • संदीप - गाव गाता गजाली
 • राहुल्या - लागिरं झालं जी
 • वामन - गाव गाता गजाली

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री

 • रेवती - माझ्या नवऱ्याची बायको
 • लता - नकटीच्या लग्नाला यायचं हं
 • सायली - जाडूबाई जोरात
 • जयश्री - लागिरं झालं जी
 • नानी - माझ्या नवऱ्याची बायको
 • गायत्री - गाव गाता गजाली
 • अनन्या - जागो मोहन प्यारे
 • गोदाक्का - तुझ्यात जीव रंगला
 • सविता - गाव गाता गजाली

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष

 • आनंद - माझ्या नवऱ्याची बायको
 • बबन - गाव गाता गजाली
 • नीरज - नकटीच्या लग्नाला यायचं हं
 • बरकत - तुझ्यात जीव रंगला
 • आबा - गाव गाता गजाली
 • श्रेयस - माझ्या नवऱ्याची बायको
 • ऋग्वेद - जाडूबाई जोरात
 • नाम्या - गाव गाता गजाली
 • विक्रम - लागिरं झालं जी
 • भाल्या - तुझ्यात जीव रंगला
 • मास्तर - गाव गाता गजाली
 • मनोहर ( बळी )  - गाव गाता गजाली

सर्वोत्कृष्ट भावंडं

 • सुरज-राणा - तुझ्यात जीव रंगला
 • करण-अर्जुन - गाव गाता गजाली
 • शीतल-सौरभ-ध्रुव - लागिरं झालं जी
 • राधिका-दादा - माझ्या नवऱ्याची बायको
 • नुपूर-यश -  नकटीच्या लग्नाला यायचं हं

सर्वोत्कृष्ट सून

 • राधिका - माझ्या नवऱ्याची बायको
 • जुई - जाडूबाई जोरात
 • अंजली - तुझ्यात जीव रंगला

सर्वोत्कृष्ट नायिका

 • मोहिनी- जागो मोहन प्यारे
 • जुई - जाडूबाई जोरात
 • शीतल - लागिरं झालं जी
 • नुपूर - नकटीच्या लग्नाला यायचं हं
 • अंजली - तुझ्यात जीव रंगला
 • राधिका - माझ्या नवऱ्याची बायको

सर्वोत्कृष्ट नायक

 • राणा - तुझ्यात जीव रंगला
 • मोहन - जागो मोहन प्यारे
 • अजिंक्य - लागिरं झालं जी

सर्वोत्कृष्ट आई

 • राधिका - माझ्या नवऱ्याची बायको
 • नुपूरची आई - नकटीच्या लग्नाला यायचं हं
 • शीतलची आई - लागिरं झालं जी
 • जुई - जाडूबाई जोरात
 • गोदाक्का - तुझ्यात जीव रंगला
 • क्रिशची आई - गाव गाता गजाली

सर्वोत्कृष्ट वडील

 • नाना - माझ्या नवऱ्याची बायको
 • जुईचे वडील - जाडूबाई जोरात
 • प्रतापराव - तुझ्यात जीव रंगला
 • नुपूरचे वडील - नकटीच्या लग्नाला यायचं हं
 • शीतलचे वडील  - लागिरं झालं जी
 • सुहास - गाव गाता गजाली

सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा

 • भारत गणेशपुरे - चला हवा येऊ द्या
 • राहुल्या - लागिरं झालं जी
 • सागर कारंडे - चला हवा येऊ द्या
 • सुरज - तुझ्यात जीव रंगला
 • कुशल बद्रिके - चला हवा येऊ द्या
 • चंदा - तुझ्यात जीव रंगला
 • भाऊ कदम - चला हवा येऊ द्या
 • बैल - गाव गाता गजाली
 • श्रेया बुगडे - चला हवा येऊ द्या
 • जयंता - नकटीच्या लग्नाला यायचं हं

सर्वोत्कृष्ट जोडी

 • मोहन-शोभा - जागो मोहन प्यारे
 • शीतल-अजिंक्य - लागिरं झालं जी
 • जुई-मल्लिका - जाडूबाई जोरात
 • अंजली-राणा - तुझ्यात जीव रंगला

सर्वोत्कृष्ट सासू

 • जीजी - लागिरं झालं जी
 • मोहनची सासू - जागो मोहन प्यारे
 • राधिकाची सासू - माझ्या नवऱ्याची बायको
 • आईसाहेब - नकटीच्या लग्नाला यायचं हं
 • बाईसाहेब - नकटीच्या लग्नाला यायचं हं

सर्वोत्कृष्ट सासरे

 • प्रतापराव - तुझ्यात जीव रंगला
 • राधिकाचे सासरे - माझ्या नवऱ्याची बायको
 • जुईचे सासरे - जाडूबाई जोरात

सर्वोत्कृष्ट कुटुंब

 • देशपांडे - नकटीच्या लग्नाला यायचं हं
 • पवार - लागिरं झालं जी
 • सामंत - जाडूबाई जोरात
 • गायकवाड - तुझ्यात जीव रंगला
 • मिठबांव कुटुंब - गाव गाता गजाली
 • प्रधान - जाडूबाई जोरात
 • सुभेदार - माझ्या नवऱ्याची बायको

सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत

 • गाव गाता गजाली
 • लागिरं झालं जी
 • जागो मोहन प्यारे
 • तुझ्यात जीव रंगला
 • जाडूबाई जोरात
 • नकटीच्या लग्नाला यायचं हं
 • चला हवा येऊ द्या
 • माझ्या नवऱ्याची बायको

सर्वोत्कृष्ट सूत्र संचालक

 • निलेश साबळे - चला हवा येऊ द्या
 • संकर्षण कऱ्हाडे - आम्ही सारे खवय्ये
 • भगरे गुरुजी  - वेध भविष्याचा

सर्वोत्कृष्ट खलभूमिका ( पुरुष)

 • गुरुनाथ - माझ्या नवऱ्याची बायको
 • हर्षवर्धन - लागिरं झालं जी

सर्वोत्कृष्ट खलभूमिका ( स्त्री)

 • शनाया - माझ्या नवऱ्याची बायको
 • जयश्री - लागिरं झालं जी
 • नंदिता - तुझ्यात जीव रंगला
 • मामी - लागिरं झालं जी
 • मल्लिका - जाडूबाई जोरात

सर्वोत्कृष्ट आजी

 • जीजी - लागिरं झालं जी
 • अथर्वची आजी - माझ्या नवऱ्याची बायको
 • बहिरी आजी - गाव गाता गजाली
 • आईसाहेब - नकटीच्या लग्नाला यायचं हं
 • सरकती आजी - गाव गाता गजाली
 • बाईसाहेब - नकटीच्या लग्नाला यायचं हं

सर्वोत्कृष्ट बालकलाकार

 • ध्रुव - लागिरं झालं जी
 • स्वरा - जाडूबाई जोरात
 • राणा गॅंग - तुझ्यात जीव रंगला
 • क्रिश - गाव गाता गजाली
 • अथर्व - माझ्या नवऱ्याची बायको