Posted on 01 Jan, 1970 05:30 am

Likes - 0 298


‘टन टना टन’मुळे वरुण-गोविंदामध्ये राडा

अभिनेता वरुण धवनने ‘जुडवा-२’ चित्रपटाच्या ‘टन टना टन’ गाण्यातून गोविंदाचे नाव हटवले आहे. वरुण डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. तर बॉलिवूडची डेव्हिड-गोविंदा ही लोकप्रिय जोडी आहे. पण वरुण आणि गोविंदामध्ये मागील काही दिवसांपासून आलबेल नाही हे नक्की आहे.

गोविंदा एका मुलाखतीदरम्यान वरुणची आपल्याशी तुलना केल्याने भडकला होता. वरुणची तुलना आपल्याशी करणे हे गोविंदाला अजिबातच आवडले नाही. कॉमिक टायमिंग, अंदाज आणि डान्स मूव्ह पाहून सुरुवातीपासूनच वरुण धवनला नवा गोविंदा म्हटले जात आहे. पण गोविंदा तुलनेवर भडकल्यानंतर साहजिकच कोणतेही उत्तर वरुणने दिले नाही. पण असे वाटते आहे की तो ही गोष्ट विसरलेला नाही.

वरुण धवनच्या आगामी ‘जुडवा-२’ चित्रपटातील ‘टन टना टन’ हे गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. ९०च्या दशकातील प्रसिद्ध गाणे ‘टन टना टन’चे हे गाणे रिमेक व्हर्जन आहे. गोविंदाशी संबंधित एक ओळ मूळ गाण्यात आहे, वरुण धवनच्या रिमेक व्हर्जनमधून जी वगळण्यात आली आहे. मूळ गाण्यात ‘गोविंदा है हीरो और माधुरी हीरोइन’ ही ओळ आहे. पण रिमेकमध्ये ही ओळ न वापरल्याने असेच वाटते आहे की अशाप्रकारे आपला राग वरुणने व्यक्त केला आहे.