Posted on 25 Sep, 2019 02:50 pm

Likes - 2 751


सध्या सोशल मीडियावर गाजतोय 'टकामका'..!

अलिकडेच दक्षिणी भाषेचा तडका असलेला 'टकामका' हे गाणं सर्वत्र प्रदर्शित झालाय. सध्या या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर गेल्या काही दिवसांतच या गाण्याला हजारोने लाईक्स मिळाले आहेत. 

'देवयानी' या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा मराठी अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री मयुरी शुभानंदा या दोघांच्या नृत्याची झलक 'टकामका' या गण्यातून पाहायला मिळतय. तसेच या गाण्यामध्ये संग्राम साळवी दक्षिणी पेहरावात दिसतोय. 

"आण्णा रे आण्णा तु लावलास चुना का गुडघ्या बाशिंग बांधल....करुन सवरून वसाड्या बघतो कसा?.. टकामका" असे या गाण्याचे बोल आहेत. तर काही दाक्षिणात्य शब्दांनी या गाण्यात आणखी रंगत आणलीय.

'टकामका' या गण्याचे दिग्दर्शन प्रसाद अप्पा तारकर यांनी केले असून संगीत दिग्दर्शन हे प्रवीण कुवर यांनी तर संगीत भरती मांडवी यांनी आणि गाण्याला शब्दबद्ध कौतुक शिरोडकर यांनी केले आहे. कमीवेळेत या गण्याला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.