Posted on 14 Mar, 2019 03:50 pm

Likes - 0 7

'पुन्हा एकदा मानाने झळकायला 'रिंकु' येतेय तुमची मनं जिंकायला'

तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार.. जूना जाणार तेव्हाच नवा येणार... 'कागर'. 'सैराट' फेम रिंकु राजगुरू लवकरच 'कागर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरवर रिंकुचा नवा लूक पाहायला मिळतो.

'सैराट' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रिंकुने पहिल्याच चित्रपटातून यशाचे नवे विक्रम तयार केले. या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीतही इतिहास घडवला. या चित्रपटानंतर रिंकुला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. मात्र, रिंकुची बारावीची परिक्षा सुरू असल्याने 'कागर' चित्रपटाचे चित्रीकरण लांबले होते.

'कागर' चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्कंठा आणखी वाढविणारं आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याआधी त्यांनी 'रिंगण', आणि 'यंग्राड' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता 'कागर' चित्रपटालाही प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.