Posted on 01 Jan, 1970 05:30 am

Likes - 0 212


'रागिणी MMS २.२'चा हॉट टीझर रिलीज

ALT Balaji लवकरच त्यांची 'रागिनी MMS 2.2' ही वेब सीरीज घेऊन येत आहेत. नुकताच या वेब सीरीजचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. याआधी या वेब सीरीजचं हॉट पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.

आता आलेल्या टीझरमध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत. निर्माती एकता कपूरचा ‘रागिणी एमएमएस २’ हा सिनेमा २०१४ मध्ये आला होता. या सिनेमाला चांगलीच पसंती मिळाली होती. या सिनेमात सनी लिओनी मुख्य भूमिकेत होती. मात्र, यावेळी एकता वेब सीरीज घेऊन आली आहे. यात करिश्माचा हॉट अवतार बघायला मिळणार आहे. आता या टीझरने वेब सीरीजबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकताही अधिक वाढणार आहे.