Posted on 17 Sep, 2018 11:10 pm

Likes - 0 472


'माझ्या नवऱ्याची बायको' गाण्यावर दीपिका आणि प्रियांकाने धरला ठेका

सोशल मिडियावर मागील रविवारपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.‘लय भारी’या फेसबुक पेजने अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये ‘माझ्या नवऱ्याची बायको’ म्हणत चक्क प्रियंका चोप्रा दीपिका पादुकोणला डिवचताना दिसत आहे.

या व्हिडिओत ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामधील ‘पिंगा’ गाण्यामधील काही भाग एडिट करण्यात आला आहे. दीपिका आणि प्रियंकाच्या नृत्यामधील खऱ्या गाण्याऐवजी ‘झी मराठी’वरील लोकप्रिय असणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचे शिर्षकगीत एडिट करण्यात आले आहे. हा व्हिडिओ ‘मनोज शिंगस्टे एडिटींग’ नावाच्या युट्यूब चॅनलवरील आहे.

या दोघींच्या नृत्यावर खरोखरच इतकी योग्य पद्धतीने या व्हिडिओची एडिटींग जुळवण्यात आली आहे की अनेकांनी कमेन्ट्समधून व्हिडिओ एडिटरची स्तुती केली आहे. अवघ्या चार दिवसांमध्ये हा व्हिडिओला फेसबुकवर चार हजार जणांनी शेअर केला आहे. या व्हिडिओला एक लाख नव्वद हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेन्ट करुन हे एडिटींग भन्नाट झाल्याचे मत नोंदवत व्हिडिओ एडिटरची स्तुती केली आहे.