Posted on 12 Jan, 2019 12:00 pm

Likes - 0 502


विनोदवीर अभिनेता किशोर प्रधान यांचे निधन

मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन झाले आहे. मुंबईतल्या वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी शुक्रवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. वृध्दापकाळाने वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, नाटकं, मालिका आणि जाहिरात क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे.

‘शिक्षणाच्या आयचा घो,’ ‘लालबाग परळ,’ ‘भिंगरी,’ ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ अशा अनेक मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. तर ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जब वुई मेट’ या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं त्यांच्या या भूमिका कायम लक्षात राहणाऱ्या आहेत. एक विनोदी अभिनेता म्हणून देखील ते प्रसिध्द होते. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.