Posted on 08 Feb, 2019 02:40 pm

Likes - 0 658


इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला फिल्ममेकर्सचा तुफान प्रतिसाद

तिसऱ्या इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला फिल्ममेकर्सनी गतवर्षीच्या तुलनेत तुफान प्रतिसाद दिला. यावर्षी या फेस्टिवलमध्ये केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून जवळपास 194 शॉर्ट फिल्म सहभागी झाल्या आहेत.

त्यापैकी 100 शाॅर्ट फिल्मचे स्क्रिनिंग येत्या 10,11 आणि 12 तारखेला केशर चित्रमंदिर इंदापूर, पुणे येथे करण्यात येणार आहे.

मराठी, तेलुगु, मल्याळम, हिंदी, बंगाली, कोकणी आणि इंग्रजी अशा विविध भाषांतून संपूर्ण भारतातील शॉर्ट फिल्म होणार आहेत. रसिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम बघण्याची संधी सोडू नये प्रवेश सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आलेला आहे.

दरम्यान, प्रथम उत्कृष्ट शॉर्टफिल्मसाठी 15 हजार रूपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक 10 हजार रूपये व स्मृतिचिन्ह आणि तृतीय पारितोषिकासाठी 7 हजार रूपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.