Posted on 01 Jan, 1970 05:30 am

Likes - 0 248


अमेय वाघची प्रमुख भूमिका असलेल्या ‘फास्टर फेणे’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

फास्टर फेणे चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु असताना ह्या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. भा.रा भागवत ह्यांच्या फास्टर फेणे ह्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल ह्यात मात्र काही शंका नाही.

शिवाय अमेय वाघ ह्याने त्याच्या अभिनयाची झलक मोठ्या पडद्यावर या आधीही दाखवली आहे. नुकतंच आलेलं हे टिझर बघून आता चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. अमेय वाघ च्या नवीन लुक ची झलक देखील ह्या टिझर मध्ये दाखवली गेली आहे.

झी स्टुडिओज आणि रितेश विलासराव देशमुख प्रस्तुत,अजय सरपोतदार दिग्दर्शित क्षितिज पटवर्धन लिखित जिनिलिया देशमुख आणि मंगेश कुलकर्णी निर्मित फास्टर फेणे हा चित्रपट २७ ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.