Posted on 18 Nov, 2017 04:50 pm

Likes - 0 605


देवा शप्पथ ...झी युवावर एक फ्रेश मालिका

तो येतोय...आजच्या युगात...आजच्या रूपात’ असे आजच्या काळाशी धागा जोडणारे शब्द गेल्या काही दिवसांपासून झी युवा वाहिनीवरील एका प्रोमोतून कानावर पडताहेत.देवाकडे पाहण्याचा एक वेगळा पण पारदर्शक दृष्टिकोन घडवणारी ही मालिका ,लकरच प्रेक्षकांचा भेटिला येत आहे,देव आहे आणि देव नाही असे मानणारे दोन विचारप्रवाह नेहमीच आपल्याला आजूबाजूच्या माणसांमध्ये दिसतात.दगडाला मूर्तीचा आकार देऊन त्यामध्ये देव पाहणारी एक दृष्टी आहे, देव सर्वव्यापी आहे आणि तो सगळ्यात आहे.आणि तो कोणत्याही माध्यमातून, रूपातून अभिव्यक्त होऊ शकतो, प्रकट होऊ शकतो ही भावना ज्या प्रमाणे असंख्य लोकांच्या मनात आहे त्याच प्रमाणे मी देव मानत नाही

माझी मेहनत , माझे कष्ट यांवर माझा विश्वास आहे, बाकी कोणावरही नाही असे मानणारे सुद्धा अनेक आहेत. आजच्या युगातील हाच विचार घेऊन ही मालिका छोट्या पडद्यावर येत आहे. झी युवा या वाहिनीवर सोमवार २० नोव्हेंबर पासून रात्री ९:३० वाजता अश्रद्धा आणि अतिश्रद्धा यात समन्वय साधायला आलेल्या देवाची गोष्ट देवा शप्पथ या मालिकेतून पहायला मिळणार आहे. या मालिकेत देव म्हणजेच खट्याळ कृष्ण उर्फ आजचा क्रिश च्या भूमिकेत क्षितिश दाते आहे तर त्याच बरोबर त्याचा नास्तिक भक्त श्लोक च्या भूमिकेत संकर्षण खराडे आहे.

यांच्याबरोबरच विद्याधर जोशी, सीमा देशमुख, स्वानंद बर्वे , शाल्मली टोळ्ये , अभिषेक कुलकर्णी , कौमुदी वालोकर चैत्राली गुप्ते , आनंदा कारेकर आणि अतुल तोडणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत साताऱ्याजवळच्या हरीपूरच्या कृष्णमंदिराचे पुजारी विश्वासराव दशपुत्रे.आणि यांच्यापेक्षा पार अगदी वेगळ्या टोकाला असलेलं दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे श्लोक दशपुत्रे , विश्वासरावांचा धाकटा मुलगा आहे स्वकर्तृत्वावर विश्वास असलेला आणि कमालीचा नास्तिक. या दोन टोकाच्या विचारधारांमधील एक सुवर्णमध्य गाठायला देवालाच पृथ्वीवर यावं लागतं. कृष्णकांत उर्फ क्रिश या श्लोक दशपुत्रे याला क्रिश भेटायला आलाय.

झी युवा आणि झी टॉकीज चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, झी युवा ही वाहिनी एक वेगळंआणि फ्रेश कन्टेन्ट देण्यासाठी आजच्या प्रेक्षकांमध्ये ओळखली जातेय . देवाशप्पथ ही एक पूर्णपणे वेगळी संकल्पना असून या मालिकेतून आम्ही देव आणि भक्ताचे सुंदर नाते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज पर्यंत अनेक पौराणिक मालिका प्रेक्षकांनी पहिल्या आहेत, पण देवाशप्पथ ही आजच्या काळातील गोष्ट असून आधुनिक काळातही देव त्याच्या भक्ताशी कश्याप्रकारे जोडला आहे, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे एक वेगळ्या नजरेतून प्रेक्षक अनुभवतील . त्याचप्रमाणे जर देवाला आजच्या काळात खरंच पृथीतलावर यायला लागलं तर काय गंम्मत घडेल हे सुद्धा या मालिकेतून पहायला मिळेल.एक फ्रेश विचाराची , मनाला विचार करायला लावणारी आणि त्याच बरोबर निखळ आनंद देणारी एक मालिका झी युवा आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यात देव स्वतः माणसाची श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा कसा समन्वय घालतो हे पाहण्याची मजा प्रेक्षकांना एक वेगळीच अनुभूती देईल.

देव तारी त्याला कोण मारी, प्रेक्षक या मालिकेला किती तारतात हे मलिका सुरु जाल्यावरच कळेल।