Posted on 01 Jan, 1970 05:30 am

Likes - 0 577


साईच्या मुलांना सामाजिक भान देणारे नाताळ गिफ्ट

साई अर्थात सोशल ऍक्टिव्हीटीज इंटिग्रेशन ही संस्था देखील सांताक्लॉज प्रमाणेच काम करते. फरक इतकाच की ही संस्था देहविक्रय करणाऱ्या महिला व त्यांची मुले यांच्या पुनर्वसन आणि उत्कर्षासाठी कार्यरत आहे. दरवर्षी ही संस्था या मुलांसोबत नाताळ साजरा करते. यावेळी हॉलिवूड-बॉलिवूड मधील अभिनेता जे. ब्रॅण्डन हील स्वत: सांताक्लॉज बनून मुलांना साईच्या वतीने खेळणी-चॉकलेट्स-फुगे देण्यात आले. साईच्या लहान मुलांनी सांताक्लॉजचा मुखवटा लावून त्यांचा आनंद व्यक्त केला. यावेळी हेमलता तिवारी यांची स्वराधार ही संस्था सुद्धा मुलांच्या आनंदात सहभागी घेतला. कार्यक्रमामध्ये खुलता कळी खुलेना फेम अभिनेत्री मयुरी देशमुख या मुख्य आकर्षण ठरल्या. स्वराधार संस्थेतील गायक नवीन पोद्दार यांच्या गाण्यानी मुलांना मंत्रमुग्ध केले. स्वराधार संस्थेने समजापासून दूर असणाऱ्या साईच्या मुलांच्या आयुष्यात सप्त स्वराची उधळण केली. मुलांना सामाजिक भान रहावे या हेतुने स्वराधारच्या मुलांसोबत साईचे संस्थापक विनय वस्त यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यंदाचा नाताळ वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा साईचा मानस होता. म्हणूनच साई च्या मुलांनी हेमलता तिवारी यांनी सुरु केलेल्या “स्वराधार” या म्युझिक बॅन्ड सोबत आपला नाताळ साजरा केला. अपंग असलेले पण ट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या मुलांना एकत्र आणून त्यांच्यातील स्वाभीमान जागवून त्यांना मानचे स्थान देणारी स्वराधार ही संस्था आहे. या संस्थेच्या ह्या कृतीनेसाईच्या मुलांना आपण देखील मुख्य प्रवाहात असल्याची जाणीव करुन दिली. आणि हेच साईंच्या मुलांसाठी सांताक्लॉज होते. 

हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर नातळ आहे. मी या सर्व छोट्या सांताक्लॉज सोबत जो वेळ व्यतीत केला हेच या वर्षीच माझे नातळ चे गिफ्ट आहे. असे मयुरी देशमुख यांनी मुलांना सांगितले. 

सामाजिक दॄष्टीकोन असलेला सांताक्लॉज मुलांना मिळावा आणि सामाजिक भान कळावे या हेतुने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. असे उपक्रम करून साई या मुलांना समाजामध्ये स्थान देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील. असे भाष्य साई संस्थेचे संस्थापक विनय वस्त यांनी काढले.