Posted on 18 Sep, 2018 02:30 pm

Likes - 0 556


‘बिग बी’ लालबाग राजाच्या दर्शनाला

नवसाला पावणारा बाप्पा अशी ओळख असणा-या लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांसह अनेक दिग्गज मंडळीही येतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पाठोपाठ  रिलायन्स ग्रुप समूहाच्या मुकेश अंबानी यांनी कुटुंबियांसह लालबागचा राजाचे दर्शन घेतले. मात्र काल सोमवारी चक्क बॉलीवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन स्वत: बाप्पाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आले. त्यांच्या आगमनाने लालबागचा राजाच्या वातावरणातील द्विगुणीत झाली. तर महानायकाला पाहून भाविकांचा उत्साह देखील वाढला.