Posted on 01 Jan, 1970 05:30 am

Likes - 0 209


फक्त एका सीनच्या चित्रीकरणासाठी संजय जाधव यांनी वापरले ६० कॅमेरे

संजय जाधव यांचा सिनेमा हा नेहमीच प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय असतो. ये रे ये रे पैसा हा चित्रपट सध्या पुन्हा चर्चेत आलाय आणि त्याच कारण म्हणजे संजय जाधव यांचा ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटातील अनोखा प्रयोग. संजय जाधव यांनी निर्माते अमेय खोपकर यांच्याकडे ६० कॅमेऱ्यांची मागणी केली.

संजय जाधव चित्रपट बनवणार म्हणजे तो फुल टू एंटरटेनमेंट पॅकेज असणार यात कोणतीही शंकाच नाही आणि प्रेक्षकांना मनोरंजित करण्यासाठी संजय जाधव हे नेहमीच प्रयोगशील असतात, त्यामुळे काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा त्यांचा अट्टाहास लक्षात घेऊन अमेय खोपकर यांनी देखील त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आणि संजय जाधव यांनी एका सीनच्या चित्रीकरणासाठी १ नाही २ नाही तर चक्क ६० कॅमेरे वापरले. हा सिन कोणावर चित्रित केला आहे हे देखील अजून गुलदस्त्यातच आहे. हा सीन चित्रपटाच्या सुरुवातीला दिसेल की क्लायमॅक्स असेल हे अजून कोणालाच ठाऊक नाही. आज पर्यन्त असप्रयोग कुठल्याच मराठी सिनेमात झालेला नाही. हि तर चित्रपटाच्या चित्रीकरणाची फक्त सुरुवात आहे, चित्रीकरण पूर्ण होई पर्यंत अजून काय काय नवीन ऐकायला मिळेल याची उत्सुकता सर्व जनमनात निर्माण झाली आहे.

‘ये रे ये रे पैसा’ हा चित्रपट अमेय खोपकर यांच्या AVK फिल्म्सची निर्मिती असून अमेय खोपकर हेदेखील एक परिपूर्ण आणि उत्तम चित्रपट बनण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संजय जाधव दिग्दर्शित, अमेय खोपकर, सुजय शंकरवार आणि ओम प्रकाश भट निर्मित हा चित्रपट पुढच्या वर्षी ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.